Best Co-Op Bank Award



08 May, 2024

सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेश ‘बेस्ट अर्बन को – ऑप बँक’ पुरस्कार प्रदान

CREST इन्फोमेडिया आणि नागरी सहकारी बँकांची राष्ट्रीय फेडरेशन(NAFCUB) यांच्या संयुक्त विध्यामाने प्रायोजित “All Indian Urban Co-Op Banking Summit 2024” च्या वतीने सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेस “बेस्ट अर्बन को –ऑप बँक” म्हणून नुकताच पुरस्कार जाहीर झाला. सदरचा पुरस्कार सिद्धेश्वर बँकेच्या दि ३१ मार्च २०२३ अखेरच्या आर्थिक वर्षातील उत्कृष्ट कामगिरी साठी मिळाला. दि ०८ मे २०२४ रोजी पुणे येथे फेडरेशन शिखर परिषदेत सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेस सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन बँकेस गौरविण्यात आले. सदरचा पुरस्कार हा भारतातील सर नागरी सहकारी बँकाची अम्ब्रेला ऑर्गनायझेशन असलेल्या Urban Cooperative Banks (UCBs) the National Urban Cooperative Finance and Development Corporation Limited (NUCFDC) संस्थेचे चेअरमन श्री. ज्योतिन्द्र मेहता यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. बँकेच्या वतीने हा पुरस्कार बँकेचे चेअरमन श्री प्रकाश वाले यांनी स्वीकारला तर बँकेचे सरव्यवस्थापक श्री राम शर्मा, सहा. सरव्यवस्थापक श्री संजय घाळे आणि चीफ ऑफिसर श्री राजेश कलशेट्टी उपस्थित होते.

सदरच्या शिखर परिषदेसाठी रिझर्व्ह बँकेचे संचालक श्री सतीश मराठे यांच्या सह भारतातील विविध प्रांतातील नागरी सहकारी बँकच्या संघटनेचे पदाधिकारी आणि सहकार क्षेत्रातील अनेक नेते मंडळी उपस्थित होती.

बँकेचे मार्गदर्शक श्री राजशेखर शिवदारे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँक हि आजच्या घडीला सोलापूर जिल्ह्यातील अतिशय वेगाने विकसित होणारी एक सक्षम बँक म्हणून नावारूपास आली आहे. गेल्या आर्थिक वर्षाप्रमाणेच ३१ मार्च २०२४ अखेर देखील बँकेची आर्थिक कामगिरी अतिशय चांगली झाली आहे. बँकेची मिश्र व्यवहार रु ८२५ कोटीचा झाला असून बँकेस करपूर्व नफा रु. ८.७७ कोटीचा झाला आहे. तर बँकेचे नेट एन.पी.ए. प्रमाण १.११% आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी देखील सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँक हि “बेस्ट अर्बन को-ऑप बँक” हे नामांकन प्राप्त करेल असा विश्वास बँकेचे चेअरमन श्री प्रकाश वाले यांनी व्यक्त केला.